Ad will apear here
Next
चिपळुणात २८-२९ डिसेंबरला दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन
अनिल मेहता आणि डॉ. तानाजीराव चोरगेपुणे : दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन चिपळूणमध्ये २८ आणि २९ डिसेंबर २०१९ रोजी होणार आहे. मेहता पब्लिशिंग हाउसचे प्रमुख अनिल मेहता यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, महाराष्ट्र साहित्य परिषदेची चिपळूण शाखा आणि चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कोकणातील प्रसिद्ध लेखक कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असतील. तसेच, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे विद्यमान अध्यक्ष आणि लेखक-कवी अरुण इंगवले संमेलनाचे कार्याध्यक्ष असतील.

ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची मुलाखत या संमेलनात होणार आहे. तसेच, प्रकाशकांच्या समस्या, ग्रंथविक्रीच्या नव्या वाटा-नव्या दिशा, प्रवास पुस्तकनिर्मितीचा, व्यवसायापलीकडचे लेखक-प्रकाशक स्नेहबंध या विषयांवर संमेलनात परिसंवाद होणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशीदेखील संमेलनाचा उपस्थित राहणार आहेत. 

गेल्या वर्षी पहिले संमेलन भिलार या पुस्तकांच्या गावामध्ये भरले होते. यंदाच्या संमेलनाचा मान चिपळूणला मिळाला आहे. पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद लेखक डॉ. श्रीपाद जोशी यांनी भूषविले होते. एका वर्षी लेखक, तर एका वर्षी प्रकाशक या संमेलनांचे अध्यक्ष असतील. त्यामुळे यंदा या पदावर अनिल मेहता यांची निवड करण्यात आली आहे, असे राजीव बर्वे यांनी सांगितले.  



(लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या विशेष वस्तुसंग्रहालयाबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZYHCG
Similar Posts
डिजिटल पुस्तके म्हणजे प्रकाशनाच्या क्षेत्रातील संकट नसून संधी : अनिल मेहता चिपळूण : ‘नव्या माध्यमांच्या वापरातून आपले मन सुसंस्कृत करणे ही प्रत्येकाची गरज आहे. सुसंस्कृत मने तयार करण्यात पुस्तकांचा आणि पर्यायाने प्रकाशकांचा वाटा मोलाचा असतो. त्यामुळे नव्या युगातील डिजिटल पुस्तके म्हणजे प्रकाशनाच्या क्षेत्रातील संकट नसून संधी आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी चिपळुणात व्यक्त केले
गोविंदगडावर वैभवशाली मशाल महोत्सव चिपळूण : शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा मशाल महोत्सव १२ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक गोविंदगडावर साजरा झाला. किल्ले प्रतापगडानंतर कोकणात होणारा हा पहिलाच मशाल महोत्सव आहे. या निमित्ताने संपूर्ण गडाभोवती मशाली लावण्यात आल्या. गोवळकोट गावातून काढण्यात आलेली शिवछत्रपतींची
रत्नागिरीत बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्राचे १७ नोव्हेंबरला उद्घाटन रत्नागिरी : सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पात बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे केंद्र मोठ्या स्वरूपात काम करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन १७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेतीन वाजता मारुती मंदिर
एड्सविषयीच्या जनजागृतीत नर्सेसचे योगदान महत्त्वाचे रत्नागिरी : ‘एड्सबद्दलच्या जनजागृतीत आणि रुग्णांच्या समुपदेशनात नर्सेसचे योगदान महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील आशा सेविका, नर्सेस या आरोग्य यंत्रणेच्या खूप मोठ्या समन्वयक आहेत. त्यामुळे जनजागृतीची मोठी जबाबदारी नर्सिंग शिकणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांवर आहे. एड्सग्रस्तांना समाजाच्या पाठिंब्याचीही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language